क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मंगळूर ते काश्मिर पर्यावरण वाचवा, प्रकृती सांभाळा व अवयव दान करा हा संदेश घेऊन सायकलवरुन रॅली काढलेल्या जगदीश पुलाल व श्रीनिधी शेट्टी यांचे बेळगाव पॅडलर्स क्लबतर्फे स्वागत करण्यात आले.
3900 कि.मी. अंतर मंगळूर ते काश्मिर सायकलवरुन जनजागृती करण्यासाठी बाहेर पडलेल्या जगदीश पुलाल, श्रीनिधी शेट्टी यांनी मंगळूरपासून या रॅलीला सुरूवात केली. अंकोला, यल्लापूर, खानापूरमार्गे बेळगाव येथे ते पोहोचले. 600 किमी अंतर पूर्ण करुन उर्वरित प्रवासासाठी ते रवाना झाले. ते बेळगावमार्गे कोल्हापूर, सातारा, कराड, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा पंजाब येथून काश्मिरमध्ये या रॅलीची सांगता होणार आहे.
या बेळगाव पॅडलर्स क्लबतर्फे या दोघांचे स्वागत करण्यात आले. क्लबचे सदस्य विजय हिरेमठ, रघुराम, इजाज इनामदार, डॉ. किरण खोत, निखिल पाटील आदी सभासदांनी जगदीश पुलाल व श्रीनिधी शेट्टी यांचे स्वागत केले. यापूर्वीही जगदीश व श्रीनिधी यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा मोहिमेसाठी कन्याकुमारी ते मध्यप्रदेशपर्यंतचा सायकल प्रवास पूर्ण केला होता.









