मोरजी /प्रतिनिधी
मांदे पंचायतीच्या उपसरपंच पदी सौ तारा बाबुसो हडफडकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. उपसरपंच सौ चेतना पेडणेकर याच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्या नंतर गेले काही दिवस रिक्त असलेल्या उपसरपंच पद निवडी साठी बैठक बोलावण्यात आली होती . यावेळी उपसरपंच पदा साठी सौ हड फडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीला सरपंच अमित सावंत, पंच किरण सावंत,प्रशांत नाईक, रॉबर्ट फर्नान्डीस, सौ मैथिली फर्नान्डीस व सौ तारा हडफडकर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आमदार जित आरोलकर म्हणाले, माजी सरपंच सौ तारा हडफडकर या क्रियाशील कार्यकर्त्या आहेत.त्या उपसरपंच म्हणून मांदे पंचायती चा विकास निश्चितच साधतील त्याना आपले पूर्ण सहकार्य राहील असे सांगितले.
यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरपंच एड अमित सावंत यांनी सांगितले आमदार जित आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकसंघ पणे पंचायतीचा विकास साधू. उपसरपंच सौ तारा हडफडकर म्हणाल्या कर्ता करविता परमेश्वर आहे. आम्ही त्याच्या हातातील ??कठपुतली बाहूली आहोत.देवी भगवती सप्तेश्वराच्या कृपेनें आणि आमदार जित आरोलकर , सरपंच अमित सावन्त यांच्या मुळे आपण उपसरपंच झाले.आता त्यांच्या सहकार्याने मांदेचा विकास करू