वृत्तसंस्था / जालंदर
भारतीय हॉकी संघातील हुकमी हॉकीपटू मनदीप सिंग आणि भारतीय महिला हॉकी संघातील प्रमुख हॉकीपटू उदिता दुहान यांचा विवाह जालंदरच्या गुरुद्वारसिंग सभागृहात थाटात पार पडला. या विवाह समारंभाला वर आणि वधू पक्षातील कुटुंबिय सदस्य तसेच भारतीय हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हॉकी इंडियाकडून या नव्या दांपत्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मनदीपसिंग हा जालंदरचा रहिवासी असून उदिता दुहान ही हिसारची रहिवासी आहे.









