वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा मुष्टीयोद्धा मनदीप जेंग्राने व्यवसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रातील आपला चौथा विजय नोंदवला. मिलवेकू विस्किनसन येथे शनिवारी झालेल्या मुष्टीयुद्ध लढतीत मनदीप जेंग्राने आपला प्रतिस्पर्धी अमेरिकेचा रेयान रिबेरचा तांत्रिक गुणावर पराभव केला.
29 वर्षीय मनदीप जेंग्राने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. 2020 साली त्याने व्यवसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रात प्रवेश केला. या क्षेत्रामध्ये अलीकडेच जागतिक दर्जाचा मुष्टीयोद्धा रॉय जोन्स ज्युनियरबरोबर मनदीप जेंग्राचा करार झाला होता. व्यवसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रामध्ये मनदीप जेंग्राबरोबर जोन्स तीन वर्षांचा करार केला आहे. जोन्सबरोबरच्या करारानंतरची मनदीप जेंग्राची ही पहिली लढत होती. मनदीप जेंग्राने यापुर्वी व्यवसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रात झालेल्या तिसऱ्या लढतीत अमेरिकेच्या ब्रेन्डॉन सँडोव्हेलचा गेल्या मार्च मध्ये पराभव केला होता.









