रुग्णालयात आरोग्य सुविधांची कमतरता ; मागणी करूनही पूर्तता नाही
मालवण । प्रतिनिधी
मालवण ग्रामीण रुग्णालयात अनेक आरोग्य सुविधांची कमतरता आहे. मागणी -पाठपुरावा करूनही रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. याबाबत शासन, प्रशासनास जाब विचारण्यासाठी माजी नगरसेवक मंदार केणी यांनी मालवण ग्रामीण रुग्णालय समोर बुधवारी सकाळपासून आमरण उपोषण छेडले आहे. जोपर्यत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा केणी यांनी दिला आहे. यावेळी भाई कासवकर तसेच नागरिक उपस्थित होते.









