वृत्तसंस्था / चेन्नई
15 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू झालेल्या ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप टेबल टेनिस स्पर्धेत पहिल्या दिवशी मंडल विशाल आणि अक्षय भूषण, चक्रवर्ती तसेच श्रेया आणि उनजित यांनी शानदार विजय नोंदविले.
मुलांच्या 15 वर्षांखालील गटात अक्षय भूषणने पेरामचा 11-1, 12-10, 11-8 अशा गेम्समध्ये पराभव केला. चक्रवर्तीने धारीवाल सिद्धांतचा 5 गेम्समधील लढतीत पराभव केला. मुलींच्या 15 वर्षांखालील वयोगटातील सामन्यात श्रेयाने काब्रावालाचा 3-0 अशा गेम्समध्ये एकतर्फी पराभव केला.









