वृत्तसंस्था/ कोपेनहॅगेन
प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटी संघाने एव्हरटनचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात मँचेस्टर सिटीच्या हॅलेंडने पूर्वार्धात 2 गोल नोंदविले.
या सामन्यात मँचेस्टर सिटी संघाचा खेळ अधिक दर्जेदार आणि वेगवान झाला. मँचेस्टर सिटी संघाचे व्यवस्थापक गार्डिओला यांनी हॅलेंडच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आता मँचेस्टर सिटीचा पुढील सामना एफसी कोपेनहॅगेन क्लब बरोबर होणार आहे. 23 वर्षीय हॅलेंडने गेल्या वर्षीच्या प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत 36 गोल नोंदविले आहेत. सर्वाधिक गोल नोंदविणारा हॅलेंड हा सर्वात कमी वयाचा फुटबॉलपटू आहे. गेल्या वर्षी मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लिग स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.









