वृत्तसंस्था/ लंडन
येथे सुरू असलेल्या प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेमध्ये रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्यातील सामना 4-4 असा बरोबरीत राहिला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर सीटी आघाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात लिव्हरपूल संघाने ब्रेंटफोर्डचा 3-0 तसेच अॅस्टोन व्हिलाने फूलहॅमचा 3-1 असा पराभव केला.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या मँचेस्टर सिटीला चेल्सीकडून कडवा प्रतिकार झाला. मँचेस्टर सिटीतर्फे या सामन्यात हेलँडने 2 गोल नोंदविले. हा सामना अनिर्णीत राहिल्याने मँचेस्टर सिटी 28 गुणांसह पहिल्या स्थानावर असून लिव्हरपूल व अर्सनेल प्रत्येकी समान 27 गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट हॅम युनायटेडने नॉटिंगहॅम फॉरेस्टचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला.









