Manasi Naik and Pradeep Kharera Divorce: मराठी अभिनेत्री मानसी नाईक आणि पती प्रदीप खरेरा या दोघांनी आपापल्या सोशल साईटवरून एकमेकांचे फोटो काढून टाकल्यानंतर घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती.आता स्वत: मानसीने एका मुलाखती दरम्यान घटस्फोट घेणार असल्याचे कबुल केले आहे.
मुलाखतीत मानसी काय म्हणाली
मानसी म्हणाली, “मी पुण्यात वाढले.त्यामुळे ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याला नेहमीच पाठिंबा देता यावर माझा विश्वास आहे. मी माझं काम केलं. पण जर एकाच व्यक्तीला कायम समर्थन मिळतंय आणि दुसऱ्या व्यक्तीला ते मिळत नसेल तर मला वाटतं अशा नात्यातून बाहेर पडणं नेहमीच चांगलं.आजकाल बरेच लोक मानसिक आरोग्याबाबत बोलताना दिसतात. जोडीदाराने एकामेकांना कसं समजून घ्यावं,एकमेकांशी कसं बोलावं याबद्दल सांगत असतात.पण जर तुमच्या नात्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. अशा नात्यातून बाहेर पडा आणि पुढे जा असा सल्ला तिने दिला आहे.
यावेळी बोलताना ती म्हणाली की, नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे.एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत.एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं.”एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं.आणि मी लग्न केलं.अर्थात तेही सर्व खूपच घाईघाईत झालं.मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं.या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे.त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे.
Previous Articleबेळगावच्या छत्रपती शिवाजी उद्याना जवळ ट्रक धड़क
Next Article पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणाचे राजस्थान कनेक्शन उघड









