बेळगाव : अस्मिता क्रिएशन्स चित्रपट निर्मिती संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात केलेल्या जय भारत फौंडेशन व रोटरी क्लब बेलगाम इलाईट पुरस्कृत गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम सुपर सिंगर सीजन 2 तसेच गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम लिटल चॅम्प्स सीजन 2 स्पर्धेची मेगा फायनल नुकतीच पार पडली. या स्पर्धेत बेळगावची मानसी गेंजी ही गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स 2025 या किताबाची मानकरी ठरली आहे. तसेच खानापूर तालुक्मयाची कन्या काजल पाटील ही गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव सुपर सिंगर 2025 या किताबाची मानकरी तर स्वामिनी शहापूरकर ही लहान गटातील सेन्सेशनल सिंगल ठरली. मोठ्या गटामध्ये भुजंग पाटील हे सेन्सेशनल सिंगल ठरले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…
गोल्डन व्हाईस बेळगाव लिटल चॅम्प्स 2025
1.मानसीपरशराम गेंजी, 2. धन्या पाटील, 3. निधी गुडमेट्टी, 4.शशीप्रिया सिंगबल 5. गौरी अंगडी.
गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव सुपर सिंगर 2025
1.काजलपाटील, 2. काजलधामणेकर, 3. दर्शन पदकी, 4. श्रेया हेरकल, 5 जकी मुल्ला.
अस्मिता क्रिएशन या चित्रपट संस्थेचा हेल्मेट वापरण्याबाबत जागृती करण्यासंदर्भातील ‘मेरी जिंदगी जिम्मा’ हा हिंदी लघुपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव वाहतूक विभागाचे एसीपी निकम, जय भारत फौंडेशनचे बसनगौडा पाटील, रोटरी क्लब बेलगाम इलाईटचे अध्यक्ष सचिन हंगरगेकर सेव्रेटरी सुनील मुरकुंबे, नगरसेवक गिरीश धोंगडी, एंजल फौंडेशनच्या संस्थापक मीना बेनके, बेळगाव डिस्ट्रिक बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे कार्याध्यक्ष अनिल अंबरोळे, सुधाकर चाळके, दडपण चित्रपटाचे मुख्य अभिनेते शशिकांत नाईक, अन्वर साहब जारी, अस्मिता क्रिएशनचे सदस्य रतन मुचंडीकर आदी मान्यवर व अस्मिता क्रिएशनचे सर्व कलाकार उपस्थित होते. अस्मिता क्रिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष राजेश लोहार व उपाध्यक्ष राजेंद्र जैन यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून कल्याणी कोटारे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी अस्मिता क्रिएशनचे राजेश लोहार, राजेंद्र जैन व लेखक दिग्दर्शक संतोष सुतार, पवन हसबे, तेजस्विनी कदम यांनी विशेष परिश्र्रम घेतले. तसेच सोनाली पाटील हिने सूत्रसंचालन केले.









