वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ट्युनेशिया येथे झालेल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय युवा पुरुष टेनिसपटू मानस धामणेने एकेरीचे जेतेपद पटकाविले. आयटीएफ स्पर्धेतील मानसचे हे पहिले जेतेपद आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मानस धामणेने इटलीच्या लोरेंझो मोनास्टीरचा 2-6, 6-0, 6-2 असा पराभव केला. या स्पर्धेत मानस धामणेने पात्र फेरी जिंकून प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. गेल्या 8 दिवसांमध्ये त्याने सलग 8 सामने जिंकले.









