व्यवस्थापन आणि व्यवस्थापन व्यवस्थेत व्यवस्थापकांची भूमिका आणि कार्यशैली-कार्यप्रणाली महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक ठरते. आपण व आपले सहकारी-कर्मचारी यांच्याद्वारा उद्योग-व्यवसायाला अपेक्षित व्यावहारिक वळण देण्याचे महत्त्वपूर्ण काम व्यवस्थापक करतात. व्यवस्थापकांना व्यवस्थापनाचे प्रतिनिधीच नव्हे तर प्रतीक म्हटले-समजले जाते, ते उगाच नव्हे. अर्थात हे सारे वेळेत, अपेक्षित स्वरुपात, परिणामकारक व त्याचवेळी परिणामकारक होते अथवा नाही याचा पडताळा घेणे व्यवस्थापक व व्यवस्थापन या उभयतांसाठी फायदेशीर ठरते. आपल्या पुढाकाराने व आत्मपरीक्षणाद्वारे व्यवस्थापक हे करू शकतात का? बघूया…
तसे पाहता आपापल्या कामात व कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारीसह वरचे पद व त्यानुसार येणारे-मिळणारे अधिकार मिळावेत असे कुणाला वाटत नाही? प्रत्येक जण तशी इच्छा व प्रयत्न करीत असतात. काहींचे हे प्रयत्न यशस्वी होतात तर अनेकांचे होत नाहीत. व्यवस्थापनात व्यवस्थापक म्हणून दर्जा, आर्थिक प्रगती, अधिकार-प्रति÷ा इत्यादीसह वरि÷पणासह कामकाजासह येणारी जबाबदारी असतेच.
व्यवस्थापकाचे काम व त्यांची भूमिका हे मुख्यतः दुहेरी अपेक्षांवर आधारित असतात. एक म्हणजे कंपनी-व्यवस्थापनाच्या आशा-अपेक्षा व दुसरीकडे सहकारी-कर्मचारी यांच्या आशा-आकांक्षा. या दोन्ही प्राधान्य मुद्दय़ांना जो व्यवस्थापक उचित न्याय देतो त्याला यश तुलनेने सहजसाध्य होते.
कामाचे ठिकाणी व स्वरुप वेगळे असले तरी कंपनी व कर्मचाऱयांनी त्यांचे व्यावसायिक उद्दिष्ट साधण्यासाठी कर्मचाऱयांनी त्यांच्या कामाद्वारे ठरावीक कालावधीत, विशिष्ट पद्धत व सामग्रीद्वारा व मुख्य म्हणजे निर्धारित दर्जासह पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱयांना त्याची पूर्ण तपशिलवार माहिती व त्यासोबत मार्गदर्शन करणे ही प्रत्येक व्यवस्थापकाची मूलभूत पण महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. ही उद्दिष्टे पार पाडण्याची प्रेरणा संबंधित व्यवस्थापकाने दिली तर प्रसंगी अशक्मयही शक्मय होऊ शकते, हे व्यवस्थापन क्षेत्रातील निर्विवाद सत्य आहे.
यासाठी संवादाची गरज फार मोठी व महत्त्वाची ठरते. व्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी-कर्मचारी यांच्यातील परस्पर संवाद काम आणि कामकाजाला अधिक पूरक बनवितात. याला कामाच्या संदर्भात चांगले परस्पर संबंध असले म्हणजे त्याचा फायदा वैयक्तिक स्वरुपासह साऱयांनाच होतो. संवादाच्या संदर्भात अन्य महत्त्वाची बाब म्हणजे कामाच्या-कामाच्या जबाबदारीच्या संदर्भातील संवाद हा उभय बाजूने असायला हवा. वरि÷ वा व्यवस्थापकांनी आपल्या संवादाला जबाबदारीसह सहकार्याची जोड दिली तर अपेक्षित यश साध्य होते. मुख्य म्हणजे अशा संवादप्रक्रियेमुळे कामाच्या ठिकाणचे परस्पर संबंध व वातावरण अर्थातच सकारात्मक परिणाम अवश्य दिसतात. कामाच्या ठिकाणी अशी वातावरण निर्मिती साधणे व राखणे ही व्यवस्थापकांची महत्त्वाची जबाबदारी असते व ही जबाबदारी ते कशी आणि कशाप्रकारे पार पाडतात, यावरच व्यावसायिक यश अवलंबून असते.
व्यवस्थापकांनी आपले सहकारी व कनि÷ यांना संबंधित विषयात वेळेवर गरजेनुरुप विश्वासात घेणे फायद्याचे ठरते. असे केल्याने परस्पर विश्वास व कार्यक्षमता तर वाढते. अर्थात व्यवस्थापकांनी आपले सहकारी-कर्मचारी यांना प्रेरित करून त्यांना समाविष्ट करून आपल्यासह व विविध प्रकारचे काम आणि जबाबदारी यामध्ये कसे सामावून घ्यावे यासाठी टप्प्याने प्रयत्न होणे गरजेचे असते. घाई वा यासंदर्भातील घिसाडघाई उपयोगी नसते. त्याचे प्रसंगी विपरित परिणाम होऊ शकतात. हे टाळणे व आवश्यक ते घडवून आणण्यासाठी काळजी घेण्याची जबाबदारी व्यवस्थापकांनी व्यवस्थितपणे पार पाडली तर त्याचा परिणाम त्यांच्या सहकाऱयांचा क्षमता विकास होऊन त्यातूनच अधिक सक्षम सहकारी उभे राहू शकतात. उद्योग-व्यवसायातील कामे ही अनेकांनी मिळून करायची असतात. एकटी व्यक्ती प्रसंगी मर्यादित स्वरुपाचे काम तर करू शकते. पण व्यापक, मोठे काम यशस्वीपणे करण्यासाठी वैयक्तिक ज्ञान, प्रयत्न व क्षमतेला मर्यादा असतात. या व्यावहारिक मर्यादांवर मात करण्यासाठी वरि÷ वा व्यवस्थापकांनी आपल्यासह काम करणाऱया सर्वांना प्रवृत्त करण्याच्या जोडीलाच जे कर्मचारी अपेक्षितच नव्हे तर उत्तर प्रकारे काम करतात त्यांना ओळखून, प्रवृत्त करून असे काम सातत्याने करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची व्यवस्थापकीय जबाबदारी व्यवस्थापकांची असते.
यासाठी वरि÷ म्हणून व्यवस्थापकांनी काळजीपूर्वक तारतम्य बाळगणे महत्त्वाचे असते. कर्मचाऱयाला त्याच्या विशेष, उल्लेखनीय व उत्तम कामासाठी दाद दिली, त्याचे कौतुक केले तर ते अनेकांसाठी व विविध प्रकारे प्रोत्साहित करणारे ठरते. एक प्रोत्साहित व्यक्ती इतर अनेकांना प्रेरित करू शकते, हे साधे व व्यावहारिक तत्व इथे लक्षात ठेवायला हवे.
कर्मचारी विकास व व्यावसायिक वाढ या बाबी नेहमीच परस्परपूरक असतात. यातील व्यवस्थापकाची भूमिका ही नेतृत्व व कर्तृत्व या दुहेरी संदर्भात असते. आपले कार्यक्षेत्र संस्था-कंपनी याचे नेतृत्व करून व्यावसायिक यश प्राप्त करणे ही व्यवस्थापक व व्यवस्थापन या उभयतांची मुख्य व मूलभूत जबाबदारी असते. ही जबाबदारी अपेक्षित व यशस्वीपणे पार न पाडल्यास व्यवस्थापकांना त्यासाठी उत्तरदायी ठरविणे स्वाभाविक असते. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापकांजवळ त्यांच्या नेतृत्वाला सामूहिक प्रयत्नांना सर्वांच्या कर्तृत्वाची यशस्वीपणे साथ देण्याचे आव्हानपर काम करू शकतात, ते व्यवस्थापक निश्चितपणे यशस्वी ठरतात.
वरील मुद्दय़ांची पडताळणी वा पडताळा घेण्याचे फायदे व्यवस्थापकांनी जाणणे महत्त्वाचे असते. यामुळे त्यांच्या कामाला व्यावसायिक यशासह मानसिक समाधान मिळण्याचे दुहेरी लाभ होतात. हे करण्यासाठी एक साधे व सोपे तंत्र म्हणजे स्वतःचे आत्मपरीक्षण. आपापल्या वैयक्तिक गरजा व व्यावहारिक गरजांनुसार आपले विषय ज्ञान, उल्लेखनीय कर्तृत्व, यशस्वी नेतृत्व, सहकाऱयांशी समन्वय-सौहार्द राखणे, वेळेत मार्गदर्शन करणे, प्रसंगी पाठराखण करणे, सहकाऱयांच्या कौशल्य व कामगिरीविषयक प्रत्यक्ष सराव करविणे, संवाद-क्षमतेची सहकार्यासह सांगड घालणे या व यासारख्या बाबी आपण कशाप्रकारे करतो वा करू शकतो, याचा मागोवा व्यवस्थापकांना सहजपणे घेणे शक्मय आहे. यासाठी विशेष वा विशिष्ट पद्धतीच हवी असे नाही. परस्पर संवाद, कामाच्या संदर्भात समन्वय, सहकार्याची सकारात्मक भावना व मुख्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद यासह पण व्यवस्थापकांना आत्मपरीक्षण करता येईल व त्याचा फायदा त्यांना स्वतःला व सहकाऱयांनाच नव्हे तर संस्था-संघटनेला सुद्धा निश्चितपणे होईल.
– दत्तात्रय आंबुलकर








