ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आली आहे.
दया सिंह उर्फे प्यारे सिंह असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बैतुल येथील राजेंद्रनगरचा रहिवाशी आहे. काँग्रेसची भारत जोडोयात्रा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये असताना राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी या व्यक्तीने पत्राद्वारे दिली होती. इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर हे पत्र सापडले होते. त्यानंतरदया सिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. पोलिसांनी तेव्हा दया सिंह याला पकडले होते. मात्र तो जामीनावर बाहेर होता. त्यानंतर तो फरार झाला.
मात्र, त्याच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. बुधवारी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. एनएसए (NSA)अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.









