हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि अन्य काही जणांच्या विरोधात कालेश्वरम प्रकल्पाच्या निर्मितीत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप करणाऱ्या इसमाची जयशंकर भूपलपल्ली येथे हत्या करण्यात आली आहे. एन. राजलिंगमूर्ति यांनी कालेश्वरम प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर, माजी मंत्री, निर्मिती कंपनी आणि अनेक कंत्राटदारांनी त्यांनी आरोप केले होते. राजलिंगमूर्ति यांच्या हत्येमागे राजकीय पैलू नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 50 वर्षीय राजलिंगमूर्ति यांची दोन अज्ञात आरोपींनी भूमी वादामुळे चाकूने वार करत हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. राजलिंगमूर्ति हे बुधवारी दुचाकीवरून जात असताना दोन जणांनी रोखत चाकूने त्यांच्यावर वार केले होते.
Previous Articleएलटीटीएसची उलाढाल लवकरच 3 अब्ज डॉलर्सवर
Next Article जागतिक संकेतामुळे बाजार प्रभावीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









