किशिदा यांच्यावर फेकला होता स्मोक बॉम्ब
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे माजी पंतप्रधान फोमियो किशिदा यांच्यावर हल्ला करण्याप्रकरणी दोषी ठरलेल्या इसमाला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी वाकायामा जिल्हा न्यायालयाने शिक्षेची घोषणा केली. या हल्लेखोराचे नाव रयूजी किमुरा (25 वर्षे) असून त्याला 5 गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.
15 एप्रिल 2023 रोजी वाकायामा शहरात एका सभेदरम्यान त्याने किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्ब फेकला होता. हल्ल्यातून किशिदा वाचले होते, परंतु 2 जण जखमी झाले होते. किमुरा याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेतून एक चाकूही हस्तगत करण्यात आला होता. तर खटल्याच्या सुनावणीदरम्यान किमुराने हत्येच्या प्रयत्नाचा आरोप नाकारला होता. किशिदा यांना ठार करण्याचा माझा उद्देश नव्हता असे त्याने म्हटले होते.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची 8 जुलै 2022 रोजी एका सभेदरम्यान गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. नारा शहरात पक्षाच्या वतीने प्रचार करत असताना ही घटना घडली होती. 42 वर्षीय हल्लेखोराने पाठीमागून गोळीबार केला होता.









