बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोक्सो न्यायालयाने 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 15 हजार ऊपयांचा दंड तर आरोपीला सहकार्य करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. परशुराम अशोक कमटेकर (वय 19 रा. कोन्नूर ता. गोकाक) आणि अऊण शिवानंद सनदी (वय 22 रा. बस्तवाड ता. हुक्केरी) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी परशुराम याने 22 एप्रिल 2017 रोजी एका अल्पवयीन मुलीला आपल्या मोटारसायकलवरून बसवून घेऊन अपहरण केले. त्यानंतर तिला हुक्केरी तालुक्मयातील बस्तवाड गावातील नातेवाईक अऊण याच्या घरी ठेवले.
त्याठिकाणी आरोपी परशुरामने 22 एप्रिल 2017 ते 3 जून 2017 दरम्यानच्या काळात दररोज अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली. या खटल्याची सुनावणी पोक्सो न्यायालयात सुरू होती. न्यायालयात 9 साक्षीदार, 42 पुरावे, 6 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यावेळी आरोप सिद्ध झाल्याने मुख्य आरोपी परशुरामला न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 15 हजार ऊपयांचा दंड ठोठावला. तर दुसरा आरोपी अऊण याला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 4 लाख ऊपयांची मदत करण्याचा आदेशही बजावण्यात आला. सरकारतर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









