मुंबई पोलिसांची पश्चिम बंगालमध्ये कारवाई
वृत्तसंस्था/ कोलकाता
कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही भाजप नेत्याची भरदिवसा हत्या
महिन्यांपासून चर्चेत आहे. सुरुवातीला काही कथित गुंडांनी कॅनडामधील त्याच्या नवीन रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला. आता त्याला धमक्या आणि 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याचदरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने धमकी देणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. संबंधिताचे नाव दिलीप चौधरी असे आहे. त्याने कुख्यात गुंड रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने शर्माला धमकी देऊन 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
आरोपीने कपिल शर्माला केवळ धमकीचे कॉल केले होते. तसेच धमकावणारे व्हिडिओ देखील पाठवले होते. 22 ते 23 सप्टेंबर दरम्यान कपिल शर्माला आरोपींकडून धमकीचे सात कॉल आले होते. ही धमकी वेगवेगळ्या नंबरवरून देण्यात आली होती. कपिल शर्माच्या तक्रारीनंतर मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल येथून आरोपीला अटक केली. आता त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपीचा गुंडांशी थेट संबंध आहे की तो फक्त धमकावण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करत होता, हे उघड होणार आहे.









