प्रतिनिधी/ बेळगाव
अन्नभाग्य योजनेतील तांदळाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला ऐगळी, ता. अथणी पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याजवळून सात क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला आहे.
बाडगीजवळ पोलीस, अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. राजू बसरगी, राहणार ककमरी, ता. अथणी असे त्याचे नाव आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या तांदळाची बेकायदा वाहतूक प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी प्रताप रायकर व ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सागनूर आदींनी राजूवर एफआयआर दाखल करून तांदूळसाठा जप्त केला आहे.









