कलाश्री उद्योग समूहाच्या ड्रॉमध्ये शाहूनगरच्या दीपा कणबरकर 43 इंची कलर टीव्हीच्या विजेत्या
बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री सोसायटी व उद्योग समूह आयोजित एफडी ठेव लकी ड्रॉमध्ये बैलूरच्या ममता झांजरे भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना 10 ग्रॅम सोने मिळाले तर उद्योग समुहाच्या सोळाव्या बंपर ड्रॉमध्ये शाहूनगरच्या दीपा कणबरकर भाग्यवान ठरल्या. त्यांना 43 इंची कलर टीव्ही मिळाला.समूहाचे अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी प्रमुख पाहुणे प्रकाश अष्टेकर, अनिल हुंद्रे, लक्ष्मण झांजरे, व्ही. पी. डिचोलकर, शंकर पाटील, अतुल शिरोले या मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर कलाश्री ग्रुपचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली व प्रथम उद्योग समूह ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये पहिले बंपर 43 इंची एलईडी टीव्हीच्या मानकरी दीपा कणबरकर ठरल्या. चार उपविजेते प्रियंका खानापुरे, कागणी-कालकुंद्री, ओवी पाटील शिवशक्तीनगर-अनगोळ, मल्लाप्पा काकतकर मण्णूर, महादेव गडकरी हे भाग्यवान ठरले. त्यांना टी केटर बक्षिसादाखल देण्यात आले.
त्यानंतर कलाश्री को-ऑप. व्रेडिट सोसायटी लिमिटेडतर्फे वर्धापनदिनानिमित्त एफडी ठेवलेल्या सभासदांचा ड्रॉ काढण्यात आला. विजेते पुढीलप्रमाणे- 10 ग्रॅम सोन्याच्या विजेत्या ममता झांजरे बैलूर, मुमताज बेगम नदाफ, मच्छे (500 ग्रॅम चांदी), निकिता निलजकर, कंग्राळी के. एच. (43 इंची एलईडी टीव्ही), पुंडलिक भैरू पाटील, वडगाव (कॉर्नर सोफासेट), पृथ्वीराज पाटील, कंग्राळी के. एच. (रुपये 25000). या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे सुपूर्द करण्यात आली. त्याचप्रमाणे वेळेत उपस्थित असणाऱ्या चार भाग्यवान ग्राहकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उपस्थित सर्वांसाठी घरगुती वस्तू सवलतीने देण्यात आल्या. वाय. बी. पवार यांच्या ग्रुपचा या ठिकाणी 1 ते 4 या वेळेत वधू-वर सूचक मेळावा झाला. कार्यक्रमासाठी कलाश्री सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद डोळेकर, संचालिका रश्मिता यादव, संचालक राजीव होनुले, संचालक अक्षय जांगळे, संचालक कृष्णा पाटील, संचालक नागेश हट्टीकर, संचालक किरण होसमनी, गोवा डीलर सारिका कित्तूरकर, डीलर सिद्धाप्पा तुकानाचे, प्रकाश बेळवटकर, पुंडलिक मजूकर, मार्केटिंग मॅनेजर पुंडलिक राजगोळकर, राजू डोळेकर, श्रीनिवास पोळ, विजय पाटील, विष्णू डोळेकर, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पाखरे यांनी तर आभार टी. डी. पाटील यांनी मानले.









