वृत्तसंस्था /कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांना गंभीर दुखापत झाली असून सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी, असे ट्विटमध्ये लिहिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचार करून परतत असताना झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या डोक्मयाला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एसएसकेएम ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, ही दुखापत नेमकी कशी झाली हे अद्याप पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तरीही गुरुवारी संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान त्यांना ही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. ममता यांच्या पक्ष टीएमसीने ट्विट करून त्यांच्या दुखापतीची माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी जखमी झाल्याची माहिती मिळताच त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एसएसकेएम ऊग्णालयाबाहेर जमायला सुऊवात केली होती. मात्र, ऊग्णालयाभोवती फारशी गर्दी होऊ नये, असे पक्षाने म्हटले आहे. ममता बॅनर्जी गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप सक्रिय झाल्या होत्या. त्या अनेक दिवसांपासून जोरदार निवडणूक रॅली आणि जाहीर सभा घेत असतानाच त्या जायबंदी झाल्या आहेत.









