वृत्तसंस्था/ सारब्रुकेन, जर्मनी
भारताची महिला बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ सुपर 300 हायलो ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
मालविकाने पहिल्या फेरीच्या सामन्यात बल्गेरियाच्या ऱ्हस्टोमिरा पोपोवस्काचा 21-6, 21-17 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानावर असणाऱ्या मालविकाने पहिला गेम आरामात घेतला. दुसऱ्या गेममध्ये पोपोवस्काने कडवा प्रतिकार केला तरी मालविकानेच या गेमसह सामना जिंकून आगेकूच केली. गेल्या वर्षी या स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळी तिला येथे सहावे मानांकन देण्यात आले आहे. तिची पुढील लढत डेन्माकंच्या इरिना अमेली अँडरसेनशी होईल.









