शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती
मालवण / प्रतिनिधी
सिंधुरत्न योजनेतून मालवण आणी कुडाळ ह्या दोन तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या विविध कामांसाठी सुमारे १,५३,००,००० चा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी दिली.मालवण आणि कुडाळ तालुक्यातील वेळोवेळी भेडसावणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणी सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष मा.दिपकभाई केसरकर यांचे जवळ वेळोवेळी शिवसेना मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख श्री.बबन शिंदे तसेच कुडाळ तालुका प्रमुख श्री. योगेश तुळसकर आणि मालवण तालुका प्रमुख श्री.राजा गावकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
कुडाळ आणि मालवण तालुक्यातील विविध ठिकाणचे ट्रान्स्फार्मर, आवश्यक ठिकाणी भुमिगत विज वाहिनी, स्ट्रीट लाईट, ११ केव्ही लाईन इत्यादी विविध कामांसाठी सिंधुरत्न योजनेतून १,५३,००,००० एवढा भरीव निधी मंजुर करण्यात आला. सिंधुरत्न योजना म्हणजे मा. दिपकभाईंच्या सुपीक डोक्यातून निघालेली एक सर्वोत्तम कल्पना आहे. पुर्वीच्या असलेल्या चांदा ते बांदा ह्या योजनेतुन हजारो लाभार्थ्यांना लाखो रूपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. आणी आता तीच योजना सिंधुरत्न म्हणुन समोर आली आहे. यापुढे ह्या योजनेच्या माध्यमातून विविध स्तरांवरच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल आणि त्यासाठी मालवण तालुका प्रमुख श्री. राजा गावकर यांनी सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष मा. दिपकभाई केसरकर यांचे आभार मानले आहेत









