जिल्हाधिकारी आदेशानुसार कार्यक्रमात सहभागी
त्या राजकीय नेत्यावर कारवाईची मागणी
मालवण; प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरातील माती एकत्रित करून जिल्हाधिकारी कार्यालयात कलश जमा करण्यासाठी सहभागी झाले असताना पालिकेत कर्मचारी नाही असे सांगून पालिकेची बदनामी केल्याबद्दल नगरपालिका कर्मचारी आज आक्रमक झाले होते. कर्मचारी वर्गाने काळ्या फिती लावून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी सर्व कर्मचारी वर्ग कार्यालयाबाहेर थांबले होते. संबंधित राजकीय नेत्यावर कारवाईची मागणी कर्मचारी वर्गाने लावून धरली आहे.









