Malvan municipality area will change
मालवण नगरपालिका इमारत सुशोभीकरणाचे रुपये 56 लाख रुपयाचं काम 2019/20 मध्ये वैशिष्ठपुर्ण योजनेतून आमच्या कालावधीत करण्यात आले. त्यामूळे नगरपरिषद इमारतीला एक सौदर्य प्राप्त झाले. त्यानंतर मालवण नगरपरिषद इमारत परिसर सुशोभीतकरून इमारतीच सौदर्य अजून वाढविण्याच्या दृष्टीने सन 2020/21 मध्ये जिल्हास्तरीय नग्रोथान योजनेतून रुपये 74 लाख प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्याला मंजुरी प्राप्त झाल्यावर दि.23 मार्च 2021 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. आणि आता ते काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
या कामात इमारतीच्या दर्शनी भागात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे मालवण नप च्या गाड्यासाठी पार्किंग व्यवस्था, नप मध्ये कामासाठी येणाऱ्यांच्या गाड्यासाठी पार्किंग, अग्निशमन गाडी साठी स्वतंत्र रोड करण्यात येणार आहे. नप च्या दर्शनी भागात फाऊटन बसवण्यात येणार आहे , त्यामुळे सुशोभीकरणात अजून भर पडणार आहे.
मालवण / प्रतिनिधी