चौके / वार्ताहर
Sindhudurg Accident News : मालवण एसटी आगारातून पहाटे 4.50 वाजता सुटणारी मालवण बार्शी गाडी चौके कसाल रस्त्यावरील कुपेरीचीघाटी याठिकाणी अपघातग्रस्त झाली. गाडीतील आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदरच्या घटनेची माहिती माजी नगरसेवक यतीन खोत यांना मिळताच त्यांनी पोलिस आणि आरोग्य यंत्रणा यांना माहिती दिली. अपघातग्रस्त गाडीच्या मागून जात असणारी दुसरी गाडी थांबली आणि मदतकार्य सुरू झाले. जखमींना घळणीतून बाहेर काढण्यात आले. स्थानिक गावकरी यांनीही सहकार्य केले. हा अपघात सकाळी सहाच्या दरम्यान झाला.









