मालवण / प्रतिनिधी
खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णाला पुढे पाठवले
एका वयोवृद्ध रुग्णास मालवण ग्रामीण रुग्णालयातून ओरोसला नेत असलेली १०८ रुग्णवाहिका भर रस्त्यावरच बंद पडली. अखेर एका खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून रुग्णास ओरोसला रवाना करण्यात आले. या प्रकाराबद्दल नागरिकांकडून शासकीय आरोग्य यंत्रणेवर तिव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णवाहिकांच्या दुरावस्थेमुळे एखाद्यास जीव गमवावा लागल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत होता.









