यादगिरी अन् गुलबर्गा जिल्ह्यात कारवाई : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने शनिवारी घेतलेल्या विविध महामंडळांच्या रिक्त पदांच्या परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी कलबुर्गी आणि यादगिरी येथे पोलिसांनी एकूण 13 जणांना अटक करून त्यांची चौकशी करत आहेत. राज्यातील पीएसआय परीक्षा घोटाळ्याचे सूत्रधार आर. डी. पाटील हे या गैरव्यवहारामागे असावेत, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला पाटील हा जामिनावर बाहेर आहे.
परीक्षेला बसलेले उमेदवार ब्लूटूथ वापरून उत्तरे लिहीत असल्याची माहिती आहे. प्रारंभी पोलिसांनी शरण बसवेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असलेल्या त्रिमूर्ती तळवारला अटक केली होती. दरम्यान, चौकशी केली असता त्याने अनेक बाबींचा उलगडा केला. त्याचा भाऊ अंबरीश परीक्षा केंद्राबाहेर बसून मोबाईलद्वारे उत्तरे सांगत होता. आर. डी. पाटील यांनी आपल्या भावाला मदत केल्याचा दावा त्याने केला आहे, असे समजते.
याप्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती (आरोपी 1), त्याचा भाऊ अंबरीश (आरोपी 2) आणि आर. डी. पाटील (आरोपी 3) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले त्रिमूर्ती आणि आर. डी. पाटील दोघेही अफजलपूर तालुक्मयातील सोन्न गावातील असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अभिषेक नावाच्या आणखी एका आरोपीला कलबुर्गी येथे अटक करण्यात आली आहे. अफजलापुरामध्येही तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविऊद्ध एफआयआर नोंदवण्यात येत आहे, असे कलबुर्गीचे एसपी अ•tर श्रीनिवासलू यांनी सांगितले.
अफझलपूर तालुका आणि विजापूर जिल्ह्यात नऊ उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले उमेदवार न्यू कन्नड पीयू कॉलेज, सबा पीयू कॉलेज, गव्हर्नमेंट पीयू कॉलेज फॉर गर्ल्स, एलकेईटी पीयू कॉलेज फॉर गर्ल्स आणि महात्मा गांधी पीयू कॉलेजमध्ये परीक्षेला बसले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे यादगिरीचे एसपी जी. संगिता यांनी स्पष्ट केले.









