ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Mallikarjun Kharge is the new president of Congress काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा दणदणीत विजय झाला आहे. खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. खर्गे यांना 7897 मते मिळाली. तर थरूर यांच्या पारडय़ात केवळ 1072 मते पडली. त्यामुळे खर्गे यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले असून, लवकरच याबाबतची औपचारिक घोषणा होणार आहे.
137 वर्षात सहाव्यांदा काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे शर्यतीत होते. 17 ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत 9385 जणांनी मतदान केले होते. आज सकाळी मतमोजणी झाली. त्यामध्ये खर्गे यांना 7897 तर थरुर यांना 1072 मतं मिळाली. खर्गेंचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला असून, या निवडणुकीत काँग्रेसला 24 वर्षानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे.
अधिक वाचा : शोपियांमध्ये हायब्रीड दहशतवादी इम्रान गनी ठार
सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. 2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.









