नोयडा : उत्तर प्रदेशातील नोयडा या गजबजलेल्या शहरात गॅलेक्झी प्लाझा मॉलला लागलेल्या भीषण आगीत अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत आतापर्यंत जीवीत हानी झालेली नसल्याचे समजते. आग मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आगीचा भडका उडाल्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांपैकी अनेकांनी खाली उड्या मारुन आगीपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात काही लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. आठ तासांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. अग्नीशामक दलाच्या 12 गाड्यांचा उपयोग करण्यात आला. आग लागल्याचे वृत्त दलाला त्वरित कळविण्यात आल्याने तातडीने साहाय्यता कार्य सुरु करण्यात आले. मॉलचा तिसरा मजला पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. वेळेवर आग आटोक्यात आणल्याने ती संपूर्ण मॉलभर पसरली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









