शाहुवाडी प्रतिनिधी
मलकापूर शहरातील विठ्ठल मंदिर ते नगरपरिषद मार्गावर पडलेली खड्डे ‘ त्याचबरोबर या मार्गावर असणारे गतिरोधक देखील उखडले आहेत . याकडे प्रशासन लक्ष देणार का ? तात्काळ याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या तून होऊ लागली आहे . तर बुरुड गल्ली येथे आवश्यक असलेल्या गतिरोधक बाबत ही प्रशासन विचार करणार का असा सवाल नागरिकांच्यातून येऊ लागला आहे .
मलकापूर शहरात विठ्ठल मंदिर सुभाष चौक ते मलकापूर नगरपरिषद या मार्गावर खड्डे पडले आहेत .आत्ता पावसाळ व सुरू झाला आहे .पडलेल्या खड्ड्यात पाणी साठत आहे . त्यामुळे काही वेळा वाहनधारकांना देखील अंदाज येत नाही . तर पाणी साठल्याने अनेक वेळा साथीचे रोग पसरण्याची देखील भीती नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे . बाजारपेठेत नेहमी वाहनांची वर्दळ त्याच बरोबर अनेक दुचाकी धारकांची बेदर्कार सवारी सुरू असते . त्यामुळे गतिरोधक देखील दुरुस्त करणे गरजेचे आहे ‘ याकडेही प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे .
बुरुड गल्ली येथील गतिरोधक होणार काय़?
गेले अनेक दिवस बुरुड गल्ली येथे चार ठिकाणचा मार्ग एकत्र होत आहे . या ठिकाणी अनेक वेळा अपघात सदृश्य घटना घडलेल्या आहेत . याची कल्पना नगरपरिषद प्रशासनाला दिली आहे .त्यानंतर नागरिकांनी निवेदन देखील दिले आहे . मात्र प्रशासनाने याकडे अद्यापही लक्ष न दिल्याने प्रशासन याकडे लक्ष देणार कधी की एखादी विपरीत घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल व्यक्त होऊ लागला आहे. एकूणच प्रशासनाने मरगळ झटकून तात्काळ कारवाई करावी अशी मापक अपेक्षा नागरिकांच्या तून व्यक्त होत आहे .









