वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी आपल्या वडिलांवर बालपणात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिला आयोगाने शनिवारी आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी आपल्या जीवनातील काही प्रसंग कथन करताना वडिलांकडून आपले शोषण झाल्याचा गौप्यस्फोट केला. माझे वडील मला खूप मारायचे, ते जेव्हा घरी येत तेव्हा मला खूप भीती वाटत असल्यामुळे मी पलंगाखाली लपायचे, असे मालीवाल यांनी म्हटले आहे. वारंवार होणाऱ्या शोषणामुळे ‘महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना धडा शिकवेन’ असा निश्चय मी त्यावेळीच केला होता, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.









