मल्हारपेठ गावावर शोककळा
कोल्हापूर/ प्रतिनिधी
तळ कोकणातून भुईबावडा घाट मार्गे कोल्हापूरकडे चिरे (दगड) घेऊन येणार ट्रक दरीत कोसळल्यामुळे चालक जागीच ठार झाला. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक चालक सतीश महाजन ( वय ५०) आणि त्यांचा मुलगा सुदर्शन महाजन ( रा. मल्हारपेठ, ता. पन्हाळा) हे दोघे ट्रकमधून भुईबावडा घाट मार्गे कोल्हापूरकडे येत होते. पण चालक सतीश महाजन यांचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट दोनशे फूट दरीत कोसळला. यामध्ये चालक जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत ट्रक मध्ये असलेला त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला.
चालक सतीश महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासूनआपल्या मालकीच्या ट्रकमधून मालवाहतूक आणि चिरे वाहतूकीचा व्यावसाय करत होते. बुधावारी रात्री 10.30 वाजता फणसगाव येतील दवडे यांच्याकडून चिरे घेऊन ते कोल्हापूरकडे येत होते. करुळ घाट खराब असल्यामुळे तरेळे वैभववाडी मार्गे भुईबावडा घाटातून जातं होते. भुईबावडा घाटात गगनबावड्याच्या पासून मागे सुमारे 5 की मी अंतरावर हेळ्याचा टॉप येतील एका अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रक थेट 200 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ट्रक क्लीनर असलेला त्यांचा मुलगा सुदर्शन महाजन सुदैवानेच बचावला आहे. सुदर्शनने स्वतः जखमी अवस्थेतत असताना प्रथम स्वतः ट्रक मधून बाहेर आला. त्यानंतर त्यांनी ट्रक मध्ये अडकून पडलेल्या वडिलांलांना बाहेर काढले.परंतु वडिल बेशुद्ध अवस्थेत होते. मदतीसाठी संपर्क करायचा तर आपघातात मोबाईल हरवला होता. त्यामुळे काळोखातून खोल दरीतुन झाडे झुडपे यांचा आधार घेत तो रस्त्यावर आला. तेथून गगनबावडा येथे सुमारे 5 की मी अंतरावर होता. भुईबावडा घाटात रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्यामुळे तो चालत जात होता. दरम्यान रस्त्यावरून आलेल्या टेम्पोतून तो गगनबावडा पोलीस स्टेशनला पोहोचला.तेथून त्याने आपल्या घरी नातेवाईकाना फोन केले. कळे येतुन नातेवाईक 108 ॲम्बुलन्स घेऊन भुईबावडा घाटात आले. अपघात वैभववाडी तालुक्याच्या हद्दीत असल्यामुळे गगनबावडा पोलिसांनी अपघाताची बातमी वैभववाडी पोलिसांना दिली. अपघाताची माहिती समजताच वैभववाडी पोलीस शैलेश कांबळे, राठोड घटना स्थळी दाखल झाले. ट्रॅक खोल दरीत असल्यामुळे करूळ येतील सह्याद्री जीव रक्षक टीमला पाचरण कारण्यात आले. ही टीम दरीत उतरून त्यांनी जागीच ठार झालेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढला. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेद करून गुरुवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मल्हारपेठ गावावर शोककळा
मयत महाजन हे गेली 20 वर्षे चालक म्हूणन काम करत होते. त्यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अपघाती निधनाने घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असूनमल्हारपेठ गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी, दोन मुलगे,भाऊ असा परिवार आहे.









