न्हावेली / वार्ताहर
मुंबई- गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी हा रस्ता दोन्ही बाजूने पूर्णपणे उखडून गेल्यामुळे महामार्ग वाहन चालकासाठी धोकादायक बनला होता.या महामार्गाच्या दोन्ही बाजूने सिमेंटचा रस्ता बनविण्याचे काम चालू असल्यामुळे खराब झालेले डांबरीकरण मशिनच्या सहाय्याने खरवडून काढण्यात आले आहे. या खरवडून काढण्यात आलेल्या रस्त्यामुळे मळगाव ते नेमळे दरम्यान महामार्गावरुन दुचाकी वाहनचालक वाहने चालवीत असताना वाहने वळवून स्लीप होऊन अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. या मार्गावर लवकरात लवकर काँक्रीटीकरण करुन रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.
Previous Articleसंजू परब यांचे समर्थक बंटी पुरोहित शिवसेनेत दाखल
Next Article इंद्रजीत सावंत यांचा मोबाईल ताब्यात









