Malgaon High School’s success in the National STEAM Program competition
नॅशनल स्टीम प्रोग्रॅम 2022- 23 मार्फत कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे संपन्न झालेल्या विविध स्पर्धांमध्ये मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. नॅशनल स्टीम प्रोग्राम 2022 -23 मार्फत कुडाळ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी सायन्स कॉम्पिटिशन आयोजित केली गेली त्यामध्ये मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये इयत्ता सातवीच्या कुमार नारायण विद्याधर मांजरेकर यांनी प्रथम क्रमांक तर टिंकर कॉम्पिटिशन मध्ये इयत्ता नववीच्या कु.रोहन संजय परब याने द्वितीय क्रमांक पटकावला ,कुमारी समृद्धी चंद्रकांत राऊळ हिनेही प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला होता. या यशाबद्दल मळगाव एकेवर्धक संघाचे सचिव मा श्री आर. आर.राऊळ ,अध्यक्ष श्री शिवराम मळगावकर ,खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक फाले सर ,पर्यवेक्षक कदम सर ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ ,हितचिंतक व पालक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
न्हावेली / वार्ताहर









