न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या विद्यार्थिनीनी यश प्राप्त केले, यात इयत्ता आठवीतील कुमारी वैभवी गोविंद परब हिने जिल्ह्यात 26 वा तर कुमारी समृद्धी चंद्रकांत राऊळ हिने जिल्ह्यात 38 वा क्रमांक पटकावला आहे व गणित प्राविण्य परीक्षेनंतर होणाऱ्या गणित प्रज्ञा परीक्षेसाठी दोघींचीही निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संस्थेचे अध्यक्ष श्री शिवराम मळगांवकर ,सचिव आर आर राऊळ, कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन श्री मनोहर राऊळ ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मारुती फाले, पर्यवेक्षक श्री सुनील कदम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोघींचीही तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका परुळकर मॅडम व त्यांच्या पालकांचेही अभिनंदन करण्यात आले व गणित प्रज्ञा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
Previous Articleशिंगणापूर क्रीडा प्रशालेतील सुरक्षारक्षक बदलण्याचा घाट
Next Article धामणी धरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद









