न्हावेली / वार्ताहर
Malgaon English School Malgaon Alumni Reunion
मळगाव येथील पंचक्रोशीतील सर्व माजी विद्यार्थी ,विद्यार्थिनी,मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे पदाधिकारी, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांचा स्नेह मेळावा विद्यालयात संपन्न झाला. या प्रशालेमध्ये 60 ते 70 हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. हे विद्यार्थी जर स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र येऊन भेटतील व विचारांची आदान प्रदान होईल या आपल्या शाळेसाठी काय करता येईल शाळेची सुरुवात होत असताना जर विचार केला तर त्यावेळी सर्वांकडे पैसा नव्हता अशा वेळी शाळेची इमारत होत असताना श्रमदान सुद्धा फार महत्त्वाचे आहे शाळेच्या शैक्षणिक विकास इतर उपक्रमांमध्ये शाळेचा जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यांमध्ये सुद्धा नावलौकिक आहे म्हणजेच शाळेच्या शैक्षणिक विकास झालेला आहे. मात्र इमारतीचा विकास झालेला नाही मुलांच्या शैक्षणिक विकास करत असताना समाजाचे योगदान फार महत्त्वाचे असते. असे विचार प्रशालेचे माजी विद्यार्थी माजी मुख्याध्यापक मा. दिवाकर राऊळ यांनी विचार मांडले.
शेखर पाडगावकर असे म्हणाले की आम्ही कष्ट केले ते या मुलांच्या नशिबामध्ये कष्ट नको येऊ दे मुलांना प्रेरणा देण्यासाठी आर्थिक बोजा नाही तर भार सांभाळूया. मी बारा वर्षे जो उपक्रम राबवला तो या हेतूने जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे माझ्यासारखे स्वावलंबी होतील तेव्हा हे संस्कार व सुविचार वाटले जातील सौ. रुपाली परब म्हणाले आज मी या शाळेमुळे मोठी झाली या शाळेने मला माझ्या व्यक्तिमत्त्वाची बांधणी केली या शाळेची प्रत्येक शिक्षकाने मला मोलाचे मार्गदर्शन केले. या शाळेची मी सदैव ऋणी आहे मी शाळेला आर्थिक मदत करायला तयार असल्याचे सांगितले श्री श्री सांगेलकर सर म्हणाले की इथल्या सर्व शिक्षक प्रामाणिक व एक निष्ठेने काम करत आहेत त्याचप्रमाणे मी ही प्रामाणिक व एकनिष्ठेने काम करत आहे मी इथे शालेय जीवनामध्ये पेज पिऊन शिकलो या पेजेची चव आजही माझ्या जिभेवर आहे या शाळेचा परिपाठ बसून घेतला जातो असेही बरीच वैशिष्ठपूर्ण शाळा असल्याने पटसंख्या टिकून असल्याचे सांगितले









