वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलचा क्रीडा महोत्सव हायस्कूलच्या क्रीडांगणावरती उत्साही वातावरणात झाल्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी जवाहर देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून शितल कंग्राळकर, श्रुती मोरे, संजय चौगुले होते. प्रारंभी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना पतसंचलन करत उपस्थित पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर जवाहर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून सुनील हलगेकर, व्ही. एम. देसाई, करण पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. जवाहर देसाई यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे व्हायचे असेल तर खेळ अभ्यासात रममान होवून उत्तम संस्काराचे धडे घेतले पाहिजे.









