सक्षम वैमानिक नसल्याची संरक्षण मंत्र्यांनी दिली कबुली
वृत्तसंस्था/ माले
भारतासोबत तणावादरम्यान चीनचे समर्थन करणारे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांच्या नेतृत्वाखालील मालदीव सरकारची असमर्थता आता जगासमोर आली आहे. भारताकडून दानाच्या स्वरुपात प्राप्त विमानांचे उड्डाण करण्याकरता मालदीवकडे सध्या सक्षम वैमानिक नसल्याची कबुली तेथील संरक्षणमंत्री घासन मौमून यांनी दिली आहे.
दोन हेलिकॉप्टर्स आणि एक डोर्नियर विमानाचे संचालन करण्यासाठी मालदीवमध्ये तैनात भारतीय सैनिकांना तेथील सरकारने देश सोडण्याचा आदेश दिला होता. मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाकडे (एमएनडीएफ) भारतीय सैन्याकडून दानाच्या स्वरुपात प्राप्त विमानांचे उ•ाण करू शकणारा कुठलाच तज्ञ वैमानिक नाही.
याकरता भारताकडून यापूर्वी मालदीवच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले जात होते, परंतु मोइज्जू यांचे सरकार सत्तेवर आल्यावर हे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. अशा स्थितीत दोन हेलिकॉप्टर्स आणि डोर्नियर विमानाच्या उ•ाणासाठी परवाना असलेला किंवा उ•ाणाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला वैमानिक नसल्याची कबुली मालदीवचे संरक्षणमंत्री मौमून यांनी दिली आहे.









