मलेरिया निर्मूलन जागृतीफेरीत सहभागी डॉक्टर, विद्यार्थी व शिक्षक.
प्रतिनिधी / बेळगाव
मलेरिया मासनिमित्त मलेरिया निर्मूलन जनजागृती फेरी काढण्यात आली. मलेरिया हा आजार डासांपासून होतो. तेव्हा डासांपासून संरक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मलेरिया आजारावर उत्तम प्रतीची औषधे आहेत. वारंवार ताप येत असेल तर मलेरिया असू शकतो. त्यासाठी रक्ताची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. या मलेरियाबाबत आता जनजागृती केली जाणार आहे. गुरुवारी वंटमुरी परिसरात ही जागृती फेरी काढण्यात आली.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, तालुका आरोग्य कुटुंब कल्याण खाते आणि रोटरीच्या संयुक्त विद्यमाने ही जनजागृती फेरी काढण्यात आली. डॉ. एम. एस. मल्लेद यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी काढण्यात आली. कर्नाटक पब्लिक स्कूल रामतीर्थनगरच्या विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी यामध्ये भाग घेतला होता. संपूर्ण देश मलेरियामुक्त करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. वंटमुरी परिसरात ही फेरी काढण्यात आली. यावेळी मलेरिया निर्मूलनाबाबत माहिती देण्यात आली.