जपानच्या एका पोलीस अकॅडमीने एक इनोव्हेटिव्ह सिलेबस सुरू केला आहे. याच्या अंतर्गत पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना आता मेकअप करण्याची कला शिकावी लागणार आहे. याकरता प्रोफेशनल सौंदर्य सल्लागारांची देखील भरती करण्यात आली आहे. पोलीस कॅडेट्सच्या मेकअप करण्याचे ट्रेनिंग इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. जपानच्या फुकुशिमा प्रांतातील पोलीस अकॅडमी फुकुशिमाकेन केइसात्सुगाकोने 60 पोलीस कॅडेट्ससाठी मेकअप कोर्स सादर केला आहे. यात पदवी स्तरानजीक पोहोचलेले अनेक पुरुष पोलीस अधिकारी सामील होते.
सकारात्मक प्रभाव
स्वच्छ अन् प्रोफेशनल प्रेजेंसचे महत्त्व समजत विशेष स्वरुपात पोलीस अनेकदा समुदायाच्या विविध सदस्यांना भेटत असल्याचे विचारात घेण्यात आले आहे. अकॅडमीचा उद्देश सकारात्मक प्रभावाला चालना देणे आहे. समाजाचे सदस्य आणि भावी पोलीस अधिकारी म्हणून व्यक्तिमत्त्वाद्वारे सकारात्मक प्रभाव कायम राखणे महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव करून देऊ इच्छितो, असे पोलीस अकॅडमीचे उपप्रमुख ताकेशी सुगिउरा यांनी सांगितले आहे.
मेकअप करण्याची पद्धत
मेकअप कोर्स व्यावसायिकतेचे उच्च मापदंड पूर्ण करतो. अकॅडमीने प्रसिद्ध जपानी सौंदर्य प्रसाधन ब्रँड शिसेडोच्या सल्लगारांच्या सहकार्यातून या तज्ञांनी केवळ सामान्य मेकअप करण्याच्या पद्धती या पोलीस कॅडेट्सना सांगितल्या नाहीत, तर कॅडेट्सना विशेष स्वरुप तयार होण्याचा व्यक्तिगत सल्लाही दिला.
आइब्रो ट्रिम करणे, प्राइमर लावण्याचे प्रशिक्षण
कोर्सदरम्यान ट्रेनरने कॅडेट्सना मूलभूत मेकअप तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. यात त्वचेला नरमाई देणे, प्राइमर लावणे आणि आइब्रो पेन्सिलचा वापर करत त्याला आणखी टोकदार करणे सामील आहे. कॅडेट्सना आवश्यक ग्रूमिंग स्कील्सही शिकविण्यात आले, यात आइब्रोला ट्रिम करणे आणि केसांना स्टाइल करणे, ओठांचा रंग योग्य ठेवणे सामील आहे. अनेक पुरुष कॅडेट्सना मेकअपची सवय नव्हती, त्यांना कॉस्मेटिक्सच्या माऱ्यामुळे समस्या झाली. काही लोक स्वत:च्या चेहऱ्यावर प्राइमर अव्यवस्थितपणे लावताना दिसून आले. तर अन्य जण असहाय्य होत इकडे तिकडे पाहत स्वत:च्या सहकाऱ्यांकडून मदत मागताना दिसून आले.
अनेक कॅडेट्सना जाणवला बदल
युसेई कुवाबारा यांना या कोर्सनंतर पूर्णपणे बदलाचा अनुभव आला. मी पूर्वी कधीच मेकअप केला नाही. पोलीस अधिकारी होण्याचा अर्थ लोकांच्या नजरेत राहणे आहे. याचमुळे कामावर जाण्यापूर्वी मी स्वत:ला चांगल्याप्रकारे सादर करणे सुनिश्चित करेन असे त्यांनी म्हटले आहे. पारंपरिक स्वरुपात जपानी पोलीस अकॅडमींनी स्वत:च्या प्रशिक्षणाला मुख्यत्वे कायदेशीर शिक्षण आणि कठोर शारीरिक तयारीवर केंद्रीत केले आहे. अशाप्रकारच्या पुढाकाराची सुरुवात त्यांच्या प्रशिक्षण प्रणालीत आधुनिक ट्रेंडचे प्रतिनिधित्व करते, जे भविष्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना समुदायासोबत शिष्टाचारासोबत जोडण्यासाठी आवश्यक कौशल्याने युक्त करते.









