आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सांगतेय मेकअपचे स्वरुप
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) आणि ऑगमेंटेड रियलिटी (एआर)द्वारे मेकअप इंडस्ट्रीत नवोन्मेषाचे नवे युग येत आहे. मेकअप कंपन्या आणि ब्रँड आता एआय आधारित स्मार्ट ब्युटी मिरर आणि व्हर्च्युअल मेकअप अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना प्रॉडक्ट टेस्ट अँड ट्रायल ऑफर देत आहेत.

प्रत्येक ग्राहकासाठी एकाच उत्पादनाऐवजी ग्राहकांच्या त्वचेच्या स्वरुपानुसार विशेष उत्पादने तयार केली जात आहेत. याचबरोबर बाजाराचा ट्रेंड ओळखण्यासाठी देखील एआयची मदत घेतली जात आहे. मेकअप ब्रँड मेबेबिलने मायक्रोसॉफ्टसोबत एआय टेकचा करार केला आहे. मेबेलिनची पालक कंपनी लॉरियलकडे ऑन स्क्रीन मेकअपसाठी मॉडीफेस अॅप आणि एक व्हर्च्युअल मेकअप बॅग आहे, याद्वारे 12 मेकअप लुक्स ट्राय केले जाऊ शकतात.
1.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार उलाढाल
भारतातील ब्युटी आणि कॉस्मेटिक बाजारात 2020 मध्ये 26,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली होती. 2031 पर्यंत हे प्रमाण वार्षिक 19.6 टक्क्यांनी वाढून 1.30 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत सध्या विदेशी कंपन्यांचा दबदबा आहे, परंतु अनेक भारतीय कंपन्यांकडून त्यांच्यासोबत प्रतिस्पर्धा केली जात आहे. जानेवारी महिन्यात एसटी लाउडरने एक व्हॉइस एनेबल्ड मेकअप असिस्टेंट अॅप्लिकेशन लॉच केले आहे. यात युजर लिपस्टिक, आई शॅडो किंवा फौंडेशन लावण्यासाठी ऑडिओ फीडबॅक प्राप्त करता येऊ शकतो.
एआयच्या मदतीने मिळणाऱ्या सुविधा
डीएनए टेस्टिंग किट : युजरच्या जीनच्या आधारावर कंपन्यांना प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची शिफारस.
अॅट होम डिव्हायसेस : युजरची त्वचा, चेहऱ्याचा रंग, उंची इत्यादीचे आकलन करून विशेष उत्पादनाशी शिफारस.
फेस स्कॅनर : चेहऱ्याच्या रचनेनुसार संबंधिताला वेगवेगळे लुक्स सुचविले जाऊ शकतात.
व्हर्च्युअल मेक-अप टूल : या विशेष एआय टूलमध्ये विविध कॉस्मेटिक उत्पादनांना ग्राहक ट्राय करू शकतात.
एआर फिल्टर्स : हे फिल्टर्स युजर्सला डिजिटल ऑब्जेक्ट्स वास्तविक स्वरुपात दाखवून देतात.









