खेड :
दापोली विधानसभा मतदार संघात आमदार योगेश कदम यांनी विकासकामांची गंगा वाहती केली आहे. माझ्याच पावलावर पाऊल ठेवत विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून गाव-वाड्यांचा सर्वांगीण विकास साधणारे विकासात्मक दूरदृष्टीचे आमदार योगेश कदमांना विक्रमी मताधिक्क्यांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.
योगेश कदम यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील तिसंगी येथील प्रचार सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कदम यानी सातत्याने विकासकामांच्या निधीसाठी पाठपुरावा केला आहे. या विकासनिधीतून मतदार संघाचा कायापालट करण्याची किमया त्यांच्याकडून झाली आहे. जे मला “जमले नाही, ते मुलाने करून दाखवल्याचा सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गारही काढले.








