उन्हाळा आला प्रत्येक घरात सांडगे,पापड ,चटणी त्याचबरोबर बरेच वाळवणाचे प्रकार तयार केले जातात. वर्षभर जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सांडगी मिरची,ताक मरची, मसाला कारले असे बरेच पदार्थ बनवले जातात. आज आपण यातलाच प्रकार असणारी दही गवार कशी बनवायची हे पाहणार आहोत.ही रेसिपी सोपी तर आहेच शिवाय खूप टेस्टी देखील आहे. चला तर मग ही गवार कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
सर्वप्रथम गवार धुवून घ्या मग त्याच्या शिरा काढा.आता एका बाऊलमध्ये १०० ग्राम आंबट दही घ्या. त्यामध्ये एक चमचा लाल तिखट, एक चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. यानंतर दह्याच्या मिश्रणात नीट केलेली गवार घालून चमच्याने हलवून घ्या.आणि २ तास झाकून ठेवा.नंतर एका प्लास्टिक च्या कागदावर गवार पसरवून उन्हामध्ये वाळवून घ्या. गवार उन्हात कडकडीत वाळल्यानंतर एका हवाबंद डब्यात एका पिशवीत घालून ती स्टोअर करून ठेवा.दही गवार तळून कधीही जेवणात तोंडी लावण्यासाठी वापरा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









