Wedding Rice Recipe Tips : लग्न म्हटलं की मसाला भात आठवतो. भात , डाळीचा आमटी(सार), कोशिंबिर, थोड पापड आणि सोबतीला लोणचं अस समीकरण पूर्वीच्या लग्नात पाहायला मिळायचं. अलीकडे बुफे टायप आणि जेवणात ही अनेक व्हराय़टी खायला मिळतात. मात्र लग्नाच्या पंगतीतील भाताची चव ही निराळीच असते. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रीय लग्नाच्या पंगतीतील भात घरी कसा बनवायचा याची रेसीपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊय़ा.
साहित्य
तांदुळ -4 वाट्या
फ्लॉवर- 1 वाटी
वटाणा- 1 वाटी
कांदा- 1 वाटी
आल्ले लसूण पेस्ट-1 चमचा
हिरवी मिरची- बारीक चिरलेली 2 ते 3
तेल- अर्धी वाटी
खडा मसाला- शाह जिरे, लवंग, काळी मिरी, तमाल पत्र
गोडा मसाला
बदाम फूल- 3
डालचिनी तुकडे- 4
जायपत्री- 2
हिरवे वेलदोडे- 7 ते 8
शहाजीरे- 1 चमचा
दगडफूल
धने – 2 चमचे
टीप- हे सर्व मसाले न भाजता एकत्र वाटून घ्या.
साहित्य :
सुरवातीला गॅसवर कढई गरम करायला ठेवा, आता यात तेल घाला. तेल गरम झाले की यात शहाजीरे, काळी मिरी, लवंग, तमाल पत्र, आल्ले लसून पेस्ट घालून परतून घ्या. त्यानंतर त्यात कांदा, हिरवी मिर्ची घाला. यानंतर हळद, चवीनुसार तिखट घाला. त्यानंतर त्यात तांदुळ घाला. तांदुळ थोडा परतल्यानंतर पाणी डब्बल घाला. त्यात चवीनुसार मीठ घाला. तांदळाला उकळी आल्यानंतर धुतलेला फ्लॉवर आणि टोमॅटो घाला. हे मिश्रण मिक्स झाल्यावर त्यात थोडीशी साखर, गोडा मसाला दोन चमचे घाला. यानंतर मंद आचेवर हा भात 10 ते 12 मिनिटे झाकून ठेवून शिजवा. आता त्यामध्ये वाफवलेले हिरवे मटार घाला. त्यावर साजूक तूप घाला. झाला लग्नातील मसाला भात तयार. आता सर्व्ह करताना कोथंबिर, ओलं खोबर, साजूक तूप घाला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









