Toast Pizza Recipe: आजकालच्या मुलांना पिझ्झा,बर्गर,सँडविच असं फास्ट फूड जास्त आवडतं. बऱ्याच वेळी मुले हे पदार्थ खाण्यासाठी हट्ट देखील करत असतात. पण हेच पदार्थ आपण घरीच बनवून दिले तर? शिवाय यासाठी हेल्दी रेसिपी सापडली तर अजून छान. अशीच एक रेसिपी म्हणजे टोस्ट पिझ्झा. शिवाय ही रेसिपी झटपट देखील बनते.शिवाय मुलांनाही डिश खायला खूप आवडेल.ला तर जाणून घेऊया ही रेसिपी कशी बनवायची.
साहित्य
ब्रेड
चीज
शिमला मिर्चीचे काप
कांद्याचे उभे काप
बटर
गाजर टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
काळी मिरी पावडर
कृती
हा पिझ्झा बनवण्यासाठी सर्व प्रथम यासाठी लागणाऱ्या भाज्या धुवून बारीक चिरून घ्या. आता एक नॉन-स्टिक तवा घ्या आणि त्यावर ब्रेडचे स्लाइसला बटर लावून बेक करा. ब्रेड थोडासा भाजल्यानंतर सॉस लावा.आता त्यावर चीझ किसून त्यावर ठेवा.आता तुम्हाला सर्व भाज्या घालाव्या लागतील.तुम्ही यात स्वीट कॉर्न देखील टाकू शकता. नंतर चीज, मीठ, काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर घाला.आता ब्रेड तव्यावर ठेवा आणि प्लेटने १५ मिनिटे झाकून ठेवा.गॅस फक्त मध्यम आचेवर ठेवा. आणि तयार झालेले झटपट तयार होणारे हे टोस्ट पिझ्झा गरमा गरम सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









