संक्रातीमध्ये तीळ आणि गुळाला जास्त महत्व दिले जाते. थंडीच्या वातावरणात तीळ आणि गुळासारखे उष्ण पदार्थ जास्त खायला हवेत. यापासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात. आज आपण झटपट आणि पौष्टिक असणारे तिळाचे लाडू कसे बनवले जातात हे जाणून घेणार आहोत.
साहित्य
तीळ -१ वाटी
शेंगदाणे – पाव वाटी
गुळाची पावडर – १ वाटी
तूप – ४ चमचे
वेलची पूड- १ चमचा
कृती
सर्वप्रथम कढईमधे तीळ टाकून ते मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या. त्यानंतर एका प्लेट मध्ये तीळ काढून घ्या आणि शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या. भाजलेले तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड गूळ आणि तूप घालून मिक्सरमधून वाटून घ्या.आता हाताला थोडेसे तूप लावून या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. अगदी कमी वेळेत,स्वादिष्ट आणि पौष्टिक असणारे हे लाडू तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा.
Previous Articleकॉंग्रेसचे आमदार सुनिल केदार यांना 1 वर्षाची शिक्षा
Next Article संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून









