रंगाचा सण म्हणजे रंगपंचमी. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रंग खेळायला आवडते.पण अनेक रंगांमध्ये केमिकल्स असतात यामुळे त्वचा खराब होऊ शकते. त्याच बरोबर याचा केसांवर देखील वाईट परिणाम दिसून येतो.पण जर या रंगांऐवजी घरीच नैसर्गिक रंग बनवले तर त्याचा आपल्याला त्रासही होणार नाही आणि रंगपंचमीचा आपल्याला मनसोक्त आनंदही घेता येईल.हे नैसर्गिक रंग आपण घरी असलेल्याच गोष्टींपासून बनवू शकतो. ते कसे बनवाचे ते आज आपण जाणून घेऊ.
किसलेला बीट पाण्यात टाकल्यास आपल्याला यापासून गुलाबी रंग मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला किंवा केसांवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही.बेसन पीठ, मुलतानी माती आणि हळद एकत्र करून घरच्या घरी पिवळा रंग तयार होतो.याचा लेप त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.
पालक ची प्युरी करून ते पाणी छोट्या छोट्या फुग्यांमध्ये भरून तुम्ही लहान मुलांना रंग खेळायला देऊ शकतो.
चहा पावडर किंवा कॉफी उकळून ती गाळून थंड केल्यास ते पाणी तुम्ही रंगपंचमी खेळायला वापरू शकता.
पांगाऱ्याची फुलं सावलीत वाळवून घेऊन त्याची भुकटी बनवून घेतल्यास त्यापासून सुगंधी नारंगी रंग मिळतो.
अशाप्रकारे घरच्याघरीच नैसर्गिक होळीचे रंग तयार करा आणि यावर्षी सुरक्षित होळी साजरी करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









