गायरान जमीन गेल्यास भविष्यात मोठी समस्या : पालकमंत्र्यांना ग्रामपंचायतीतर्फे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर गाव हे शेती प्रदान गाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनावरे पाळली आहेत. या ठिकाणी पशुवैद्यकीय केंद्रही आहे. यावरुन जनावरांचा अंदाज मांडता येतो. या जनावरांना चरण्यासाठी गायरान जागेची नितांत गरज आहे. असे असताना या ठिकाणी तब्बल 40 एकर गायरान जागेत राष्ट्रीय क्रीडांगण उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येळ्ळूर वासीयांना गायरान जागाचा उरणार नाही. तेव्हा हा प्रकल्प तातडीने थांबवावा, अशी मागणी येळ्ळूरवासियांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्व्हे क्रमांक 1142 मध्ये सध्या केवळ 49 एकर 13 गुंठे जागा शिल्लक आहे. त्यामधील 40 एकरमध्ये जर स्टेडियम उभे केले तर गायरान जागाच शिल्लक राहणार नाही. याचबरोबर या ठिकाणी हरिमंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अनेकांनी घरेही बांधली आहेत. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तेही या जागेमध्येच आहे. जर स्टेडियमसाठी ही सर्व जागा गेली तर ही सर्व आस्थापने हटवावी लागणार आहेत.
5 कोटीची योजना वाया जाण्याची भीती
या बाबत सारासार विचार करून होणारे स्टेडियम थांबवावे व ते इतर गावांमध्ये उभे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून जवळपास 5 कोटी रुपयांमध्ये पाणीयोजना राबविण्यात येत आहे. मात्र अधिकारी व कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही योजना पूर्णत्वाला जाणे अवघड आहे. पाईप घालणे याचबराब्sार नळजोडणी करताना कोणतेच नियोजन केले नाही. त्यामुळे संपूर्ण पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी
सध्या काही नळांना या योजनेद्वारे पाणी जोडणी करण्यात आली. मात्र जवळपास 50 टक्क्यांहून अधिक नळांना पाणीच येत नाही. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. अशा तक्रारी वाढल्या आहेत. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. विद्युत खांब जीर्ण झाले आहेत. याचबरोबर ट्रॉन्स्फॉर्मरही अत्यंत जुने असून ते कधी बंद पडतील, याची शाश्वती नाही. तेव्हा त्याची पुनर्जोडणी करावी. काही ठिकाणी घराला लागूनच विद्युततारा गेल्या आहेत. या तारांचा स्पर्श होवून मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा घरापासून जवळ असलेल्या या तारांबाबत खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या गटारी व रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. ती पूर्ण करावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे.
येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेणसे, दयानंद उघाडे, जोतिबा चौगुले, शिवाजी नांदुरकर, राकेश परीट, परशराम पाटील, अनुसया परीट, मनीषा घाडी, रुपा पुण्यण्णावर, परशराम परीट, राजू डोण्dयाण्णावर, सोनाली येळ्ळूरकर, लक्ष्मण छत्र्याण्णावरसह ग्रामस्थ होते.









