शिरोळ प्रतिनिधी
मिळालेल्या संधीचं सोनं करा तसेच गोरगरीब जनतेची कामे करून त्यांना दिलासा द्या असे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले
दत्तवाड ता (शिरोळ) येथील अक्षय अशोक नेरले नेरले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की, लोकहिताचे दृष्टी डोळ्यासमोर ठेवून मिळालेल्या अधिकाराचा वापर करा तसेच देश सेवेचे व्रत अंगीकार करण्याचे सांगून जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले. यावेळी बोलताना अक्षय नेरले म्हणाले की दोन वेळा परीक्षेत अपयश आले म्हणून कचुन न जाता तिसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे कोल्हापूर जिल्ह्यातून दोनच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे सांगून कोणत्याही क्लासला न जाता घरीच अभ्यास करून यश मिळवले आहे वडील अशोक नेरले हे देश सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत आई श्वेता नेले या गृहिणी असून त्यांची पुण्याई व प्रेरणा मिळाली असल्याची त्यांनी सांगितले.
शिरोळ फोटो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेले अक्षय नेरले यांचा सत्कार करताना गणपतराव पाटील सोबत वडील अशोक नेरले, सौ श्वेता नेरले, ईतर मान्यवर.