उद्याच्या चाबूक मोर्चात सहभागी होण्याचे मध्यवर्ती म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोडच्या नावाखाली तालुक्यातील 32 गावांच्या शेतकऱयांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे रिंगरोडच्या विरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 28 रोजी भव्य चाबूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा दिला असून मोठय़ा संख्येने शेतकरी तसेच नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी हलगा-मच्छे बायपास तर आता रिंगरोड या माध्यमातून तालुक्मयातील शेतकऱयांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सरकारकडून वेळोवेळी होत आहे. बेळगाव तालुक्मयात सुपीक जमिनींमधून महामार्ग काढून कोणता विकास होणार आहे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आधीच अनेक प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱयांच्या जमीनी काढून घेतल्या असून आता रिंगरोडसाठी पुन्हा तालुक्मयातील शेतकऱयांच्या जमिनींवर डोळा आहे.
शहरी-ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद
रिंगरोड विरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने चाबूक मोर्चा जाहीर केला आहे. या मोर्चाला शहरी तसेच ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने बेळगाव शहर आणि तालुक्मयातील शेतकरी, नागरिक, महिला, युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे.









